नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवावा, अशी मागणी केली आहे.मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी केल्यास आम्ही एकदिलाने काम करू आणि विजय खेचून आणू, असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितले.यानंतर राज ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे काम करत आहेत, याचा आढावा घेतला. सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, दत्तात्रय कोते यांनी सांगितले.बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. स्वच्छ प्रतिमा, मनसेची काम करण्याची आक्रमक स्टाईल आणि राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्यास शिर्डी मतदारसंघात नक्कीच परिवर्तन होईल, असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.
Home नगर जिल्हा शिर्डी लोकसभेसाठी बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारीचा आग्रह… मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंना साकडे






