Wednesday, April 17, 2024

सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य…. म्हणाले लवकरच मी कायमचा इकडे येईल…

खासदार डॉ.सुजय विखे-पाटील शनिवारी शिर्डीच्या नजीक असलेल्या राहता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी सुजय विखे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, “शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल. काळजी करु नका.”, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले. सुजय विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुजय विखे यांची ही बदललेली भाषा म्हणजे त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, याबद्दल कुणकुण लागल्याचा परिणाम आहे किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles