शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पवार यांनी आव्हाडांना घरचा आहेर देत टीका केली होती. या टिकेला आव्हाडांनी थेट उत्तर दिले आहे. ते म्हणाले की,रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार महत्त्व आणि लक्ष देत नाही. अजून ते फार लहान असून, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाहीये असे म्हणत त्यांची ही पहिलीच टर्म असल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे. आव्हाडांच्या या उत्तररामुळे त्यांनी आता थेट पवार कुटुंबियांशी पंगा तर घेतला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ते शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काल (दि. 3) जे मी बोललो ते ओघात बोलल्याचे स्पष्टीकरणही आव्हाडांनी दिले आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. रामासंबंधात वाद मला वाढवायचा नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.