शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र गुलागिरीतून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात येऊन राऊत यांनी विखे पाटलांवरही नाव न घेता टीका केली. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, हे कसले महसूलमंत्री? हे तर आमसूल मंत्री. विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत संतापल्याचे दिसून आले.
हे कसले महसूलमंत्री? हे तर आमसूल मंत्री….राऊतांची विखेंवर टीका…
- Advertisement -