साई भक्तांनी 20 डिसेंबरला जर शिर्डी येथे साईबाबांच्या (Sai Baba Mandir) दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 20 डिसेंबरला दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र, 20 डिसेंबरला साईबाबांच्या मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग होणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संग्रहित केला जाणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगसाठी गठित करण्यात आलेली तज्ञांची समिती साई मूर्तीची पाहणी करणार आहे. यामुळे दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याबाबत साईभक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन साई संस्थानकडून करण्यात आले आहे.