नगर : जगातील करोड़ो लोकांचे श्रध्दास्थान असणारे श्री साईबाबांच्या मूर्ती वाराणसी येथील मंदिरातून काढण्यात येत आहे, त्याचा आम्ही जाहिर निषेध करतो. साईबाबा हयात असताना त्यांनी आयुष्यभर गोरगरीबांची सेवा करण्याचे कार्य केले. कधीही कोणत्याही जातीधर्माचा द्वेष केला नाही. तसेच त्यांनी जगाला श्रध्दा, सबुरी व शांततेचा संदेश दिला त्यामुळे आजही लाखो भक्त शिर्डीला पायी जात असतात. श्री साईबाबांच्या शिकवणीनुसार अनेक लोक आजही आपल्या जीवनात समाजसेवेचे कार्य करत आहे.. श्री साईबाबांना नाव ठेवणारी अनेक लोक आजपर्यंत आली गेली मात्र श्री साईबाबांना कोणीही बदनाम करू शकले नाही. तरी आपण साईभक्तांच्या भावना लक्षात घेउन श्री साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून काढणारया विघ्नसंतोषी वर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देशाची गृहमंत्री अमित शाह व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे श्री साई बाबा सेवा ट्रस्ट व साईदास सेवा ट्रस्टच्या वतीने पत्राद्वारे करत घटनेचा जाहीर निषेध केला, यावेळी श्री साईबाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय जाधव, श्री साईदास परिवार ट्रस्टचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष शंकर बोरुडे, लक्ष्मीकांत तिवारी, दिलीप तावरे, व्यंकटेश जोशी, निशिकांत शिंदे, अनंत द्रविड, विजय शेळके, राज शिंदे आदी उपस्थित होते