गितिका सहानी रा. दिल्ली राजहरा, जि. बालोद (छत्तीसगड) यांनी त्यांचे मालकीचे मौजे शिर्डीमधील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २१ चे क्षेत्र ५१.०९ चौ. मी. ही मिळकत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना नोंदणीकृत दानपत्राद्वारे देणगी स्वरूपात दिली आहे. या मिळकतीची किंमत रक्कम रुपये १८ लाख २४ हजार इतकी आहे. याचे दानपत्र करून घेणे कामी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे मालमत्ता विभागाचे प्रभारी अधीक्षक विठ्ठलराव बर्गे हे हजर होते. गितीका सहानी यांचेकडून या फ्लॅटची चावी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी स्विकारली. दानशूर महिला साईभक्त गितिका सहानी यांचा साई संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी सत्कार केला. यावेळी मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.
- Advertisement -