शिर्डी येथील साई समाधी मंदिरात प्रवेश करताना यापुढे शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. ओळखपत्र दाखवूनच मंदिर परिसरात प्रवेश मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साई संस्थान प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रांगे व्यतिरीक्त संस्थानच्या इतर प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार आहे. प्रशासकीय कामातील कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ, इतर प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासून शारीरिक तपासणी करूनच सोडण्याचा आदेश सुरक्षा अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
समाधी मंदिर आणि परिसरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी आता ग्रामस्थांना आधार कार्ड सारखे ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शनासाठी जगभरातून मोठया प्रमाणात साईभक्त येतात. मंदिर परिसर आणि दर्शनरांग परिसरात आठ महाद्वार आहेत. साईभक्तांचे सुलभ दर्शनासाठी या प्रवेशद्वाराचा वापर करतात.