Tuesday, May 28, 2024

शिर्डी लोकसभा ‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ सोमवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास घडली घटना घडली आहे. या दगडफेकीत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने या घटनेत उत्कर्षा रूपवते यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

मात्र, या घटनेनं अहमदनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या आपला प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री कारने संगमनेरकडे परतत होत्या.यावेळी अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. कारचालकाने सतर्कता दाखवत कार थांबवली नाही. त्यामुळे या हल्ल्यातून उत्कर्षा रूपवते थोडक्यात बचावल्या.

यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी उत्कर्षा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना एका महिला उमेदवाराच्या कारवर दडफेक झाल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles