पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच, शिरूर तालुक्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी वरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीकअप गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरपट नेल्याचेही समजते.
पोलिस पाटलाची ‘आर्ची’…भरधाव पिकअप चालवताना दोघांना उडवले, एकाचा मृत्यु
- Advertisement -