Wednesday, June 25, 2025

आजारी असतानाही चौकडी पवार साहेबांना प्रचारासाठी फिरवत आहे, अजित पवारांची टीका…

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उरळी कांचनमध्ये पार पडली. यावेळी अजित पवारांनी बोलताना शरद पवार गटाच्या नेत्यांवर टोलेबाजी केलीयं.

अजित पवार म्हणाले, उरळी कांचनमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. शरद पवार हे माझेही नेते आहेत. प्रत्येकाचा काळ असतो काल ते आजारी होते परवाही त्यांना बोलता येत नव्हतं. 2004 साली असंच झालं होतं. आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रुग्णालयात जा ऑपरेशन करा आम्ही सगळं पाहतो. त्यावर शरद पवार म्हणाले मी जातोयं, सेनापती नाही सैन्याने लढायचं आहे सैन्य लढलं ना…आज एवढी उष्णता आहे आधार दिल्याशिवाय ते चालू शकत नाही आणि हे बाकीचे चौकड आजूबाजूचे साहेबांना सभेला इकडे तिकडे घेऊन जात असल्याची टोलेबाजी अजितदादांनी केलीयं.

शरद पवार यांच्या आजूबाजूच्या चौकडांना असं फिरवायला काही वाटत नाही. उन्हाची तीव्रता वाढलीयं. धाराशिव की सोलापुरला एका जणाला सनस्ट्रोक झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांना अधिक पाणी पिलं पाहिजे, उन्हात कारण नसताना जाऊ नका, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles