Sunday, July 21, 2024

दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण, शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

शिरूर- १५ जून २०२४ पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना दोघा शिक्षकांनी, ‘तू आलास आता बस.

तुला चहापाणी करतो, तुझा मोठा सत्कार करतो,’ असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला मुख्याध्यापक कक्षात कोंडले. पायावर पाय ठेवून बळजबरीने खुर्चीत बसवले आणि अखेरीस त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना ‘तुला आता इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत बेदम मारहाण करून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनीया घटनेची दखल घेत तात्काळ महेश आनंदराव काळे व केलास फक्कड पाचर्णे या दोन मारहाण करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन केले आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी (ता. २८) हा प्रकार घडला असून विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या लेखी अहवालावरून तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे काळे व पाचर्णे या शिक्षकांवर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकाबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याने या घटनेतील गुढ वाढले आहे.

शिक्षक संघटनांच्या दबावाच्या धोसऱ्याने प्रशासनाने; तर बदनामी टाळण्यासाठी शिक्षकवर्गातून या घटनेबाबत कमालीचे मौन बाळगले जात आहे. विस्तार अधिकारी पवार यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या अहवालानुसार,ते शुक्रवारी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व कैलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी आणी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ सुरू केली.

पवार यांनी शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता’ चल तू आलाय ना, मग मुख्याध्यापकांच्या कक्षात बसू, तुला चहापाणी करतो, सत्कार करतो असे म्हणत या शिक्षकांनी त्यांना बळजबरीने मुख्याध्यापकांच्या कक्षात नेले, कक्षाचा दरवाजा लावून घेत खुर्चीत पायावर पाय ठेवून बसण्यास धमकावले. त्यामुळे भेदरलेल्या पवार यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करताच शिक्षक आणखीच चिडले, मोबाईल हिसकावून घेत टेबलवर जोरात आपटला. त्यातूनही शांत न झालेल्या या शिक्षकांनी पवार यांना मारहाण,शिवीगाळ केली. निघ इथून नाहीतर इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत हाकलून दिले.

या प्रकाराने भेदरलेल्या पवार यांनी या घटनेबाबत पंचायत समितीकडे लेखी अह‌वाल सादर केला असून, मोबाईलमधील संभाषण चित्रफीतदेखील सादर केली आहे. गटविकास अधिकारी डोके यांनी याबाबत गंभीर दखल घेत काळे व पाचर्णे या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असताना आणि शाळा सुरू झालेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिका-यांनी केल्या असून, त्यानुसार प्रत्येक शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याची मोहीम पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शुस केली आहे. त्याअंतर्गत पवार हे शाळा तपासणीसाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार अधिकारी (शिक्षण ) रघुनाथ पवार हे प्रथमच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. त्यांची पार्श्वभूमी त्रास देण्याची नाही. तरीही हा प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पवार यांनी लेखी अहवालासोबत मोबाईलमधील संभाषण व चित्रफीत सादर केली असून, चित्रफितीचे अवलोकन करता या शिक्षकांची त्यांच्यासोबतची वागणूक कशी, असेल याचा स्पष्ट अंदाज येतो
संबंधित शिक्षकांची व्हिडिओतील वाक्ये देखील आक्षेपार्ह असल्याने संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
महेश डोके -गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles