केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन दिवस ऐच्छिक सुट्या (रिस्ट्रिक्टेड हॉलिडे) घेता येतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी होती. ती मान्य करून केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक सुटीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे.
या यादीत या दिवसाचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’ असा झाला असून, त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली. मंत्री महोदयांनी ती मान्य केली.