अहमदनगर:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौर्यावर येत आहेत. माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख ल, संभाव्य उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिवसेनेचे नगर दक्षिण सह संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी होणारा संभाव्य दौरा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसांमध्ये तब्बल सहा ठिकाणी शिव जनसंवाद मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे 13 फेब्रुवारी रोजी शनिशिंगणापूर मध्ये शनी मूर्तीचे दर्शन. त्यानंतर सोनई येथील पब्लिक स्कूल येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शिव जनसंवाद मेळाव्यास संबोधिन, राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम. आयोजित करण्यात आलेला आहे. श्रीरामपूर येथे भगतसिंग चौकामध्ये शिव जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर राहाता येथे मेळावा संपन्न होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिर्डी येथे मुक्कामी असतील.
14 फेब्रुवारी रोजी कोपरगाव, संगमनेर, अकोले इथे शिव जनसंवाद संपन्न होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिर्डी येथून विमानाने मुंबईला परततील.
या मेळाव्यास मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत आदि शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.