शिवसेना आमदार अपात्राप्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केले नाही. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली. पण सत्ताधारी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या निकालाचं स्वागत करण्यात आले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल नार्वेकर यांचं स्वागत केले. त्याशिवाय त्यांनी योग्य निकाल दिल्याचेही ते म्हणाले. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माननीय अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निकाल अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा आहे. माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्याला वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे. आता कोणाच्या मनात शंका असल्याचे कारण नाही, हेच सरकार राहणार आहे. हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत. खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून, सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न प्रेफ केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फर्मेशन काढत हा घेतलेला निर्णय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमदार अपात्रतेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया,म्हणाले. …
- Advertisement -