आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या: विक्रम राठोड
अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगर महानगरपालिका नगर शहरात 36 रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावना नगर शहर शिवसेना उबाठा गट यांनी विरोध दर्शवला आहे. अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा ते मोठे आणि प्रशस्त करा आणि मदत पें अँड पार्क लागू करा असे त्यांनी म्हटले आहे शिवसेना गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे. चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा या रस्त्यावर चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही. दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेले असतात.
ही समस्या सोडवण्यासाठी पार्किंग साठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही.
मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे. याद्वारे मनपाला पाच वर्षात 21 लाख रुपये मिळणार आहे असा दावा कागदो पत्री केला जातो आहे. नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे.
एका तासाला टू व्हीलर ला पाच रुपये आणि फोर व्हीलर ला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
नगर शहरांमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात.
आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपा ने लादलेला जिझिया कर आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मनपाने शुल्का आकारणी करू नये, ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशारा देण्यात येत आहे.
नगर शहरात पें अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध, शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या
- Advertisement -