Wednesday, April 17, 2024

अंबादास दानवे ठाकरेंची साथ सोडणार! शिंदे गटात जाण्याची शक्यता…

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढील दोन- तीन दिवसांत मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न झाल्याचं वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles