शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नागपूर विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना ही धमकी देण्यात आली. सुषमा अंधारेंनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहनही यावेळी केले.सुषमा अंधारे या नागपुरात गेल्या होत्या. आज पहाटे त्या नागपूर विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघाल्या. त्याचवेळी विमानतळावर 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या, असे सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर ला विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता.