सावेडी येथील बंधन लॉन महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या नेत्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखडे, खा.सुजय विखे, भाजपाचे प्रदेश आ राम शिंदे, राष्ट्रवादीचे आ संग्राम जगताप, भाजपाचे आ. बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे प्रदेश सदस्य प्रा.भानुदास बेरड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेनेचे नेते बाबुशेट टायरवाले, संपर्कप्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख अनिल शिंदे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, आरपीआयचे(आठवले गट) सुनील साळवे, यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री कर्डिले म्हणाले, आता पक्षाच्या घोषणा देऊ नका. कधी काही होईल याचा सांगता येत नाही. उद्या जर लोकसभा विधानसभा झाली तर काय घडेल हे देखील आता सांगता येत नाही. त्यामुळे घोषणा देऊ नका, असेही ते म्हणाले. सगळ्यांनी 45चा आकडा सगात आहे, मग ते तीन खासदार कोण निवडून येतील हे सांगावे. आपण जर सगळे एकत्र आले तर 48 खासदार निवडून येतील असेही ते म्हणाले. येणाऱ्या लोकसभेत सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. आता वरती एकत्र आहे. लोकसभा झाल्यावर काय विधान सभे वेळी काय होईल हे सागवे. विधान सभा देखील लोकसभे सोबत घेतल्यास आम्ही देखील सखुरुप होऊन जाऊ, असेही ते म्हणाले.
आ राम शिंदे, राज्यात 36 ठिकाणी आज मेळावे होत आहे. विकसित sanklp यात्रेच्या माध्यमातून योजना सागितले. सर्व घटकना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. महायुतीचे सरकार आल्यानंतर खरी कर्जमुक्ती मिळाली. नियमित कर्ज भरणाऱ्या देखील 50हजाराची मदत मिळाली. राज्यात कधीही काही होईल असेही ते म्हणाले.
खा सदाशिव लोखंडे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार शेत्राच्या माध्यमातून सुरू योजनांची माहिती दिली, त्यातून शेतकरी उभा राहिला असल्याचे त्यांनी सागितलं.
लोकसभेबरोबरच विधानसभाही व्हाव्यात, आम्ही सुखरुप होवू, माजी आ. कर्डिलेंची फटकेबाजी
- Advertisement -