हास्यजत्रेतून शिवाली परबला ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून विशेष ओळख मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवालीच्या प्रसिद्धीत फार मोठी वाढ झाली आहे. शिवालीने खूप कमी दिवसांत सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली.
सोशल मीडियाच्या माध्यामातून शिवाली नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती चाहत्यांसोबत हास्यजत्रेच्या सेटवरील बरेचसे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच शिवालीने एक रिल शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने ९० च्या दशकातल्या एका गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवालीने ब्लॅक अँड रेड कलरची साडी परिधान केली आहे. तिच्या साडीवर फुलांची डिझाईन पाहायला मिळत आहे. शिवालीच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
शिवालीने ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.१’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने खूपच कातील अदा देत डान्स केला. करिश्माने गाण्यामध्ये ज्याप्रमाणे हुक स्टेप केल्या आहेत, अगदी तशाच स्टेप्स तिने व्हिडीओमध्ये केल्या आहे. तिच्या हुक स्टेपने चाहत्यांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ शिवालीने हास्यजत्रेच्या सेटवरुन शेअर केला.