अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ‘बन मस्का’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगला धडा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र नुकतंच शिवानीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.
शिवानीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘ उपनिषद गंगा’ मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या वडिलांबरोबर गणित शिकताना दिसत आहेत.