मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने यश मिळवले. त्याचप्रमाणे देशाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे. त्यामुळे देशात भारतीय जनता पार्टी पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. यावेळी बहुमताचा आकडा हा ४०० पेक्षा जास्त असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ते शनिशिंगणापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. देशातील सर्वच भारतीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशी मी शनिदेवाला प्रार्थना केल्याचं ते म्हणाले.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक शनिशिंगणापूर येथील शनी देवाची पूजा केली. दरवर्षी नववर्षाला शिवराजसिंह चव्हाण हे न चुकता शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शनाला येत असतात. येथे त्यांनी तेल अभिषेक करत शनिदेवाची महापूजा केली.
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले, राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात होत असून देशभरामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्या समोरच प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे, असं ते पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हणाले.