मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं शनिवारी 113 विधानसभा मतदारसंघात विधानसभा प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्षांना विशेषतः भाजपला दिला आहे.
शिवसेनेने नगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीरामपूर या दोन विधानसभा मतदारसंघात प्रभारी व निरीक्षक नियुक्त केले आहेत. राजेंद्र चौधरी या मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे नेवासा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात शिंदे सेना लढणार की भाजप असा पेच निर्माण होवू शकतो. भाजपकडून माजी आ.बाळासाहेब मुरकुटे प्रबळ दावेदार मानले जातात.