भाजपचे छत्रपती संभाजीनगर येथील सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिनेश परदेशींचं पक्षात स्वागत केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शाह यांच्यावर बाजारबुणगे म्हणत हल्लाबोल केला.
काल परवा कालच महाराष्ट्राबाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करुन गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाही असं ठाकरेंनी म्हटलं.हे बाजारबुणगे आहेत त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे.त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र वीरांचाआहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.