उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न अंमलात आणायचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या आमदारांना फिरती मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
शिवसेनेच्या वाट्याला एकूण 12-13 मंत्रिपदे आल्यास त्याचा मेळ कसा घालायचा, ही मोठी समस्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रिपदे देऊन पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याचा पॅटर्न एकनाथ शिंदे यांच्याकडून अंमलात आणला जाऊ शकतो, असे समजते.