विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुषमा अंधारे ठाकरे गटात आल्यापासून नीलम गोऱ्हे नाराज असल्याची चर्चा होती, पण नीलम गोऱ्हेंनी याविषयी बोलणं टाळत सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. सटरफटर लोकांवर आपण बोलत नाही, असा टोला डॉ. गो-हे यांनी लगावला.
नीलम गोऱ्हे यांच्या या टोल्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. ‘ताई तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही सटरफटर लोकांकडे लक्ष देत नाही, हे चांगलंच आहे. तुम्हाला भावी आरोग्यमंत्रीपदाच्या आधीच शुभेच्छा देते. गेल्या सहा महिन्यांपासून तुमच्या प्रत्येक हालचालींवर आमचा शिवसैनिक लक्ष देऊन होता. बुलढाण्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यानंतर नीलमताई पक्षाकडे फिरकल्याच नाहीत, त्या अधिवेशनातही आमच्या नेत्यांना बोलू देत नव्हत्या, आता त्यांचा कल तिकडेच होता, तर मग थांबवायचा विषय उरत नाही,’ अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.