Monday, March 4, 2024

मिंद्याचं काय… त्याला कुठूनही धरून, खेचून आणला असता…उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत बोलताना जून २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फूटीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, माझे आमदार फुटत आहेत याची मला कल्पना होती. परंतु, हे नासके आंबे मला माझ्या पेटीत नको होते. त्यामुळे मी ते जाऊ दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्या भगव्याची प्रतिष्ठापना करायची आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या तख्तावरही आपला भगवा फडकवायचा आहे. असं केल्यास तो आपल्यासाठी यशाचा एक क्षण असेल. असे हे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून मागून घेत आहोत. मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. मी मुख्यमंत्री झालो होतो. त्यावेळी नाईलाजाने मला ते पद स्वीकारावं लागलं होतं. कारण माझे परतीचे दोर कापले गेले होते.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडताना मी जराही विचार केला नाही की हे पद कसं सोडू… मला जर त्या पदाला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत ते… त्यांना पकडून मी हॉटेलात टाकू शकलो नसतो का? त्या मिंद्याचं काय… त्याला कुठूनही धरून, खेचून आणला असता… पण मला हे सडके आंबे नको होते. आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नासते. म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles