सुजय विखे-पाटलांची मतं ही अनेक वर्षांच्या काँग्रेसच्या पुण्याईमुळे आहेत. तरीही सुजय विखे-पाटलांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. मी आत्ताच खात्रीने सांगते की, सुजय विखे-पाटील तेथून निवडून येणार नाहीत. सुनील तटकरेंच्या जागेचा जो विषय आहे. ते अगदी मी खेळकर पद्धतीने सांगते. मी राज्यशास्त्राची विद्यार्थ्यीनी म्हणून मांडते. तटकरेंची जागा जरी उभी केली तरीही भाजपने जो डाव आमच्या शिवसेनेसोबत केला होता, तशाच पद्धतीचा डाव ते अजितदादांविरोधात करतील. तटकरेंच्या विरोधात भाजप धैर्यशील पाटील किंवा इतर कोणाला बंडखोर म्हणून उभं करणार आहेत. याचा परिणाम म्हणून लोक यांना मतं द्यायचे की नाही? याचा विचार करतील”, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेबाबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.