अजित पवार नाराज होऊन आपल्या पद्धतीने कामं करून घेतात का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्यावेळेला त्यांची अशी नाराजी मी पाहिली नव्हती. माझ्यावेळेला ते माझ्यासोबत चांगले होते. पण, ते चांगलं काम करत होते म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होतं त्यांच्या उरावर अजितदादा आता बसलेले आहेत. त्यामुळे खरं अजितदादा ज्यांच्या उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजेत. आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे.”
अजितदादा ज्यांच्या उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजेत…
- Advertisement -