भेळपुरीमध्ये मुरमुरे, शेव, चिरलेल्या भाज्या, मसालेदार आंबट गोड चटणी, लिंबू टाकली जाते. त्यामुळे हा चटकदार पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा आहे. मात्र भेळपुरीमध्ये जाणारे मुरमुरे कसे बनवले जातात माहितीय का? मुरमुरे बनवतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती प्रथम त्याच्या तांदुळ भिजवत आहे. पाणी एकदम खराब दिसत आहे. यानंतर भिसलेले तांदूळ एका रिकाच्या जागी ठिगारा केला जात आहे. भिसलेले तांदुळ पायाने कुस्करत आहे. त्यानंतर हे मशीनमध्ये टाकून त्याचे मुरमुरे बनवले जातायेत.
foodie_incarnate नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.