Tuesday, March 18, 2025

स्नेहालय संस्थेमधील मुलींच्या नावाचा वापर करून धक्कादायक प्रकार !जनतेस जाहीर आवाहन

जनतेस जाहीर आवाहन
स्नेहालय संस्था, अहमदनगर

मागील काही दिवसांपासून स्नेहालय संस्थेच्या नावाचा वापर करून Instagram व अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्थेतील लाभार्थी मुलींसोबत विवाह करून देण्यासाठी पैसे मागण्याचे उद्योग काही समाजकंटक / ठकबाज करीत आहेत. ज्यामुळे संस्थेबद्दल गैरसमज पसरत आहेत. तसेच आत्तापर्यंत अनेक विवाह इच्छुक तरुणांची व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे आणि त्यांनी त्यासाठी पैसे देखील गमावले आहेत.
आम्ही या पोस्टद्वारे खुलासा करू इच्छितो की स्नेहालय संस्था वर्षातून एकदाच म्हणजे फक्त डिसेंबर महिन्यात सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करुन घेऊन लाभार्थी मुलींसोबत विवाह हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या सरकारी परवानगीने राबविते. त्यासाठी अतिशय पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा स्नेहालय आकारत नाही. त्यामुळे अश्या कोणत्याही प्रकारच्या खोट्या accounts आणि पोस्ट ना बळी पडू नका. अशी कोणतीही पोस्ट आढळल्यास लगेच आमच्या helpline नंबर शी संपर्क साधावा. आमचा Helpline नंबर आहे ९०११३६३६००.
—— कृपया कोणत्याही भुलथापांना व अमिषाला बळी पडु नका —–

आपली विश्वासू

डॉ.प्रीती भोंबे
सचिव – स्नेहालय

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles