कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात हा गोळीबार झाला. या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे
स्वामी समर्थ मंदिर नवशा गणपती परिसर या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या रस्त्यावर सोमय्या कॉलेज असून ही वेळ कॉलेज सुटण्याची असते. काही अंतरावरच कोपरगाव शहर पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.