अभिनेत्री श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ; अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते.श्रद्धा कपूर नुकतीच बोटीतून मुंबई बाहेर जाताना दिसली. त्यावेळी तिने पापाराझींशी मनमोकळा संवाद साधला. ती त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसली. ते म्हणजे त्यांच्यातलं हे सगळं संभाषण मराठीत झालं. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती म्हणते, “तुम्हाला असं उलटं चालताना पाहून मला भीती वाटते.” त्यावर एक पापाराझी तिला म्हणतो, “आता आम्हाला सवय झाली.” त्यावर श्रद्धा म्हणते, “हो मला माहित आहे, पण इथे खडबडीत आहे म्हणून.” त्यानंतर ती सगळ्यांना बाय म्हणून बोटीत बसून निघून जाते.
- Advertisement -