लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी (१५ डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. मुंबईतल्या अंधेरीमधील वेलव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर श्रेयसची प्रकृती स्थिरावली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. आता श्रेयसला उद्यापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रेयस तळपदेचे जवळचे मित्र चित्रपट निर्माते सोहम शाह यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. सोहम शाह म्हणाले, श्रेयसच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार- आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्याला डिस्चार्जही देण्यात येईल. आज सकाळीच तो माझ्याकडे बघून हसला. आमच्या सगळ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट असल्याचे सोहम शाह म्हणाले.
तसेच सोहम शाह यांनी श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेचेही कौतुक केले. ते म्हणाले, “मी दीप्तीचे मनापासून आभार मानू इच्छितो की, तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उशीर न करता, रुग्णालयात दाखल करणे खूप आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत दीप्तीने दाखवलेल्या त्तपरतेचे मला कौतुक करायचे आहे.”
Shreyas Talpade श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत जवळच्या मित्राने दिली मोठी अपडेट
- Advertisement -