मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या दमदार भूमिकेमुळे अल्पवधीतच प्रसिद्ध झालेला अभिनेता श्रेयस तळपदे याला चित्रपटाचे शुटींग झाल्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शुटींग संपून घरी गेल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागले. तो जागीच कोसळला. त्याला त्याची पत्नी दिप्तीने तातडीने अंधेरीतील रुग्णालयात नेले. त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने अँजिओग्रॉफी केले. त्यात ह्रदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळले. यामुळे डॉक्टरांनी लागलीच अँजिओप्लास्टी केली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे.
श्रेयस ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाची गुरुवारी अभिनेता अक्षय कुमारसोबत शुटींग करत होता. यावेळी त्याने अनेक लहान-मोठे सिन्स केले. सेटवर त्याची प्रकृती चांगली होती. तो हास्य विनोद करत असल्याचे सेटवरील सहकाऱ्यांनी सांगितले. परंतु घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 47 वर्षीय श्रेयस याला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्याच्यावर गुरुवारी रात्री दहा वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
Shreyas Talpade Heart Attack अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा झटका
- Advertisement -