अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात शुक्रवारी प्रभू श्रीरामांची बाल रुपातील मूर्ती ठेवण्यात आली. त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः मंदिर प्रशासनानेच हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये रामललाच्या डोळे कापडाने झाकण्यात आले आहेत. हे कापड मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर काढले जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी रामललाच्या मूर्तीचे आणखी काही फोटो व्हायरल झाले. यात मूर्तीचा संपू्र्ण चेहरा दिसून येत होता. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, “प्राणप्रतिष्ठा पूर्ण होण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे डोळे झाकलेलेच असतात. ज्या मूर्तीत श्रीरामाचे डोळे दिसून येत आहेत, ती खरी मूर्ती नाही. तरीही ती खरी मूर्ती असेल आणि तिचे डोळे दाखवले जात असतील तर हा फोटो कोणी काढला आणि कसा व्हायरल केला याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.https://x.com/ANI/status/1748552719240225029?s=20