Tuesday, February 18, 2025

Ahmednagar crime: गुन्ह्यात अटक पोलीसांच्या हातावर तुरी देत आरोपीने ठोकली धुम

अहमदनगर -चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पोलीसांच्या हाताला झटका मारून पळुन गेल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे.सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील एका दुकानात समाधान हरिभाऊ मगर (रा. अंभोरा ता. मंठा जि. जालना) हा कामाला असतांना त्यांने त्याच दुकानात चोरी केली होती. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी सायंकाळी सदर आरोपीला शहरातील ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेत असतांना त्याने पोलीसांच्या हातावर तुरी देवून बेडीसह पसार झाला आहे.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तीन पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवले असुन याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भेट देवून पोलीसांना आरोपीच्या शोधासंदर्भात सुचना केल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles