मितेश बाळासाहेब नाहाटा हा श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहे.
इंदौरच्या व्यापाऱ्याला कोट्यावधींचा गंडा…
पुणे येथील एका जणासमवेत मितेश नाहाटा याने इंदौरच्या एका व्यापाऱ्याला साखर देण्याच्या बदल्यात कोट्यावधींचा गंडा घातल्याची फिर्याद इंदौर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी मितेश नाहाटा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. नाहाटा याने पुणे शहरातील नऊ व्यावसायिकांसह इंदौरच्या व्यावसायिकाची तब्बल २.६१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. ही माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मितेश नाहाटा यांची पदावरून हकालपट्टी केल्याचे समजते.
बाळासाहेब नाहाटा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या मुलाला अटक झाल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मितेश नाहाटाला पदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी काढले.