शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यातील कार्यक्रमात घोषणा केल्या. श्रीगोंदा मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या उमेदवारीचे संकेत राऊत यांनी दिले. ‘श्रीगोंद्याचे सध्याचे आमदार बबनराव पाचपुते हे नकली पाचपुते आहेत. त्यांना बाजूला करून आता खरे पाचपुते साजन यांना आमदार करा,’ असेही राऊत म्हणाले. ‘इथे स्टेजवर बसलेले चारजण विविध मतदारसंघातून आमदार होणार’, असे सांगत आणखी काहींच्या उमेदवारीचे संकेत राऊत यांनी दिले. श्रीगोंदा येथे साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राणी लंके, वसंत मोरे, तालुकाप्रमुख विजय शेंडे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, नगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे, संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसुंदर, संभाजी कदम, शरद झोडगे, शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, सरपंच ऋषिकेश शेलार, टिळक भोस उपस्थित होते. साजन सातपुते यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका करीत येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला संधी देण्याचे आवाहन करीत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले.
श्रीगोंद्यात खा.संजय राऊत म्हणाले, स्टेजवर नगर जिल्ह्यातील 4 भावी आमदार आहेत…
- Advertisement -