Sunday, May 19, 2024

लंकेच्या चक्रीवादळात ते लांब उडून जाऊन पडतील… श्रीगोंद्यातील सभेत बाळासाहेब थोरात कडाडले…

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

निलेश लंके यांच्या प्रचाराच्या खूप सभा पाहिल्या आहेत. शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य सभेत गेले. त्यानंतर सर्वात जास्त निवडणुका करण्यामध्ये माझा नंबर लागतो. लंकेंच्या सर्व सभांमध्ये करंट असतो. साधा लाईट लागण्यामध्ये ३६० व्होल्टेजचा करंट असतो. पण तुमचा करंट तीन हजार व्होल्टेजचा आहे. ज्यावेळी तुमच्यामध्ये तीन हजार व्होल्टेजचा करंट असेल तेव्हा शॉक केवढा राहणार? जाळ होणार जाळ”, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
निलेश लंके यांच्या सभेला हजारोंच्या संख्यने लोक येत आहेत. आपण म्हणतो की, याची हवा, त्याची हवा. पण हवा राहिली नाही. आता हे वादळ आलं असून आपला मोठा विजय होणार आहे. या चक्रीवादळ कोणा कोणाला फेकून देणार, पाहा ते कसं लांब उडून जाऊन पडेल”, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना नाव न घेता लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles