Friday, February 23, 2024

श्रीगोंद्यात राजकारण तापणार…नागवडेंच ठरलं…विधानसभा निवडणूक लढवणारच…

बाप्पू हयात असताना त्यांनी सर्व नेत्यांना मदत केली. परंतु आम्हाला कोणी मदत करत नाही. काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढवणारच असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नागवडे यावेळी म्हणाले, महाविद्यालयामध्ये बापूंनी कशाप्रकारे उभारणी केली हे आपण पहात आहात, उद्याच्या काळामध्ये या संस्थेचे नाव कसे मोठे होईल यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत असेही ते म्हणाले. आम्ही सहकारी कारखाना चालवत असून शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कधीच पैसे थकवले नाहीत.

सहकार टिकला तर शेतकरी टिकेल असेल ते म्हणाले. स्वर्गीय बापूंच्या जयंतीनिमित्त १९ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles