नगर : विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच श्रीगोंदा-नगर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने श्रीगोंदा मतदारसंघातील मनसेचे धडाडीचे तालुका संघटक निलेश नवले पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काष्टी येथील नवले पाटील यांनी मनसेची तालुक्यात मोठी संघटना बांधणी केली आहे. गावागावात त्यांचा मोठा जनसंपर्क असून मनसेची उमेदवारी नक्की मिळेल या विश्वासाने ते मतदारसंघात दौरे करीत आहेत.
नवले पाटील यांच्या तयारीमुळे इतर पक्षांतील इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे. मनसे स्टाईलने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवले पाटील यांचा पुढाकार असतो. पोलीस स्टेशन असो, तहसीलदार कार्यालय, तलाठी, सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडून घेणारे, गोरगरीबांचा नेता जनतेच्या मनातील भावी आमदार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलीआहे.
पोलीस स्टेशनला निवेदन देऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे, आमदार मळा काष्टी येथील ग्रामपंचायतला निवेदन देऊन गटारलाईन तसेच पूलाचा प्रश्न मार्गी लावणे, तालुक्यात अपघात असो या भांडण-तंडण प्रश्न सोडवणे, गरीबांवर अन्याय झाल्यास आवाज उठवणे, धरणे आंदोलन करणे बरेच कामे तालुक्यात करण्यात आले आहेत.