लोकनेते आमदार बाळासाहेब_थोरात यांनी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यास उपस्थित राहून संवाद साधला तसेच या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व त्यांचे स्वागत केले.
घनश्याम अण्णा हे कायम जनतेत मिसळून राहणारे व्यक्तिमत्व असल्याने लोकांमध्ये त्यांचे नाव आहे. काँग्रेस पक्षात आल्यामुळे त्यांना आता श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक संधी आहेत. भ्रष्ट नेते भाजपात जाऊन पवित्र झाले आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून जनतेला सर्व समजले आहे.
दक्षिण लोकसभेतील निवडणूक ही धनाढ्य विरुद्ध सर्वसामान्य माणूस अशी आहे. तुमच्यासाठी काम करणारा, हाकेला धावून येणाऱ्या निलेश लंकेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी या संवाद मेळाव्यात केले.