*घनश्याम शेलारांमुळे काँग्रेसची ताकद वाढली; जयंत वाघ यांचा दावा*
नगर: एक कुशल संघटक म्हणून सुप्रसिद्ध असलेले धडाडीचे नेतृत्व घनश्याम शेलार यांच्या काँग्रेस आगमनाने पक्षाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. शेलार यांच्या काँग्रेस प्रवेशाने नगर जिल्ह्यात पक्षाला एक उभारी प्राप्त झाली असून त्यांच्या निवडीचे मी स्वागत करतो, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांचा हा प्रवेश खूप महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वीही त्यांंनी अनेक पक्षात उल्लेखनीय काम केले. संघटनात्मक पातळीवर त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या
काँग्रेसमध्ये येण्याने पक्षाला नगर जिल्ह्यात बळकटी प्राप्त झाली आहे. त्यांच्या राजकारणाचा आणि अनुभवाचा मोठा आधार पक्षाला मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार बाळासाहेबथोरात यांच्याशी चर्चा करून आपण शेलार यांना पक्षाच्या पातळीवर मोठी जबाबदारी
मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितलं.