Tuesday, May 28, 2024

घनश्याम शेलार यांनी घेतली कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची भेट.. लवकरच संघटनेत मोठी जबाबदारी…

नगर : घनश्याम शेलार यांना प्रदेश काँग्रेस पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आज, रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी पक्षांमध्ये नव्याने दाखल झालेल्या घनश्याम शेलार यांचा खर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, संपतराव म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात व जयंत वाघ यांनी शेलार यांच्या कार्याचा परिचय खरगे यांना करून दिला. बीआरएस व त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये कार्यरत असताना शेलार यांनी जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश पातळीवर उल्लेखनीय काम केले. त्यांचा संघटनात्मक कार्याचा अवाका मोठा आहे. त्याआधारे त्यांनी कार्यकर्त्यांचा संच उभा केला आहे. संघटन कौशल्य व प्रभावी वक्तृत्वाच्या आधारावर त्यांचा पक्ष कार्यासाठी उपयोग करून घेता येईल. त्यासाठी त्यांना प्रदेश कार्यकारणीवर संधी द्यावी तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तृत्वाचा पक्षाला चांगला उपयोग करून घेता येईल. यामुळे त्यांना त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्याची मागणी जिल्हाध्यक्ष वाघ यांनी खर्गे, पटोले व थोरात यांच्याकडे केली.

या तिन्ही नेत्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून आगामी काळात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles