श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात
राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र, दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले होते. अण्णासाहेब शेलार देखील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. अण्णासाहेब शेलार हे पूर्वीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नेमकी कुणाला तिकीट देणार हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. जरी राहुल जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी अण्णासाहेब शेलार हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे, येथे तुतारी कोण वाजवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
लोकसभेला श्रीगोंदा मतदारसंघातून आम्ही लंकेना 33 हजार मताचे मताधिक्य दिले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती साहेबांना भेटण्याची म्हणून भेटीसाठी आलो. उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे, साहेबांनी आशीर्वाद दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत मला साहेब संधी देतील, मी आमदार होईल. आमच्या पक्षातून कुणीही इच्छुक नाहीये, मित्रपक्षांतून इच्छुक आहेत. पण श्रीगोंदाची जागा मला मिळेल आणि मी निवडून येईल, असे राहुल जगताप यांनी या भेटीनंतर बोलताना म्हटले.