“सदाशिव लोखंडे साहेब तुम्ही म्हणाले घोषणा करा, पण मी आता माजी झालो. मला घोषणा करण्याचा अधिकार नाही. माजी सरपंच आणि माजी खासदार एकच आहे. आता आपलं काम फक्त निवेदन द्यायचं. आपण दोघेही जाऊन निवेदन देऊ. ज्यांना श्रीरामपूर जिल्हा करायचाय त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे म्हणाले. ते श्रीरामपूर येथे बोलत होते.
सुजय विखे म्हणाले, लोखंडे साहेब तुम्ही जिल्हा जाहीर करा, तुम्हाला ही माझ्या शुभेच्छा. मी फार छोटा माणूस आहे. कॉन्स्टेबल, तलाठी अशी कामं मला सांगा. एव्हढे मोठे काम माझ्याकडुन होणार नाही. एखाद्या जिल्ह्याची घोषणा करायला मी एव्हढा मोठा नाही. मी नवीन ग्रामपंचायतची घोषणा करू शकत नाही, जिल्हा फार मोठा विषय आहे. आपल्यालाच बदलून टाकलंय, आपण कुणाची बदली करणार आहे? असा सवालही सुजय विखे यांनी केला.