श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी अर्ज नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता. याच प्रक्रिये दरम्यान तालुक्यातील उंदिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत अंकुश फकीरा बर्डे यांचा सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. बर्डे जिवंत असताना मतदान यादीतून मयत घोषित करून यादीमध्ये क्र. 493 डिलीट असे लिहिण्यात आले. यामध्ये संबंधित कामगार तलाठी यांचा निष्काळजीपणा व नजरचुकीने जिवंत उमेदवार मृत घोषित झाला. ही बाब निदर्शनास आल्यावर तहसीलदार यांनी संबंधित कामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, ही घटना आ.लहू कानडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने तहसीलदार श्री. वाघ यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे अंकुश बर्डे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला.