मी पाच वर्षे पालकमंत्री असताना कोणालाही त्रास दिला नाही. सतेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक अशी बोटचेपी भुमिका कधी घेतली नाही. जिल्ह्याच्या बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणुन मला पाडलं. पडलो की पाडलं? ते माहीत नाही. मात्र तेव्हा सर्वांनी मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहु. वेळ प्रत्येकावर येते. असे विखे यांचे नाव न घेता सुचक इशारा देत पक्षाने संधी दिल्यास अहमदनगर दक्षिण मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुक लढण्याचे संकेत प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी दिले. बेलापूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. लहु कानडे होते.
आ. शिंदे म्हणाले की, सध्या खालचा आणि वरचा पाण्याचा संघर्ष सुरु आहे. मात्र मी जिल्ह्याचा पाच वर्षे पालकमंत्री असताना समन्यायी पाणी वाटप कायदा झालेला नाही, हे ठामपणे सांगू इच्छितो. तेव्हा काय घडलं आहे? हे सर्वांना माहीत आहे. आपण कधी त्रास देण्याची भुमिका घेतली नाही. मात्र बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणुन मला पाडलं. पडलो की पाडलं? हे माहीत नाही. पण तेव्हा सर्वांनी आमची मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहु. वेळ सर्वांवर येते.