अडीच वर्षे सत्तेत राहून काम करता आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विरोधकाची भूमिका कणखरपणे निभावत आहोत. सहा महिन्यांपूर्वी आपणही सत्तेत जाऊ शकलो असतो. आपल्यालाही मंत्री पदाची सवय झाली होती. पण शेवटी आपला विचार गहाण ठेवायचा नाही. शरद पवार, जयंत पाटील हे आपले आदर्श आहेत. सत्ता मिळते म्हणून आपले विचार गुंडाळून ठेवायचे नसतात. मनाला पटले नाही म्हणून येथेच थांबण्याचा निर्णय घेतला, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. पक्षाचे प्रवक्ते संदीप वर्पे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष आदिक, प्रकाश पाउलबुधे, अविनाश जगताप, सुरेश निमसे आदी उपस्थित होते.
शरद पवारांच्या विचाराचा दाखल देत आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ताकत देण्याचे आश्वासन देत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी श्रीरामपुरात राष्ट्रवादीची नव्याने मोट बांधण्याचा निश्चय केला.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, मंत्रीपदाची सवय झाली होती…सत्तेत सहज जाऊ शकत होतो…
- Advertisement -